माजी पालकमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

224

– अहेरी येथील खळबळजनक घटना

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी प्राणहिता पोलीस चौकीत कर्तव्यावर असलेल्या व माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाने बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केली. सदर खळबळजनक घटना आज, 25 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास अंब्रिशराव आत्राम यांच्या अहेरी येथील ‘रुक्मिणी महल’ नामक बंगल्याच्या आवारात घडली.

हितेश भैसारे (वय 37 वर्ष) असे आत्महत्या केेलेल्या सुुुरक्षा रक्षकाचे नाव आहे. तो अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात पोलीस नायक म्हणून कार्यरत होता. दरम्य्यान, आज सोमवारी रुक्मिणी महल येथे कर्तव्यावर असताना त्यानेे सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. सदर घटनेची चौकशी पोलीस करीत आहेत.