नगर पंचायत चामोर्शीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : आमदार डॉ. देवराव होळी

118

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नगर पंचायत येथे गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली आज शहराच्या विकासासाठी प्रलंबित असलेल्या विविध महत्वाच्या विषयावर नगर पंचायत मुख्याधिकारी यांना निर्देश दिले व शहरातील सिटी सर्व्हे, घरकुल, वाचनालय, क्रीडांगण, बस स्टॉप, लक्ष्मी गेटवर सौंदर्यीकरण, शहरातील प्रलंबित रस्ते, नाल्या, गाव तलावातील सौंदर्यीकरण, तालावर खोलीकरण, गोलीकरण समशान घाट, वाढीव पाणी पुरवठा, स्मारक, नवीन बगीचा, लेआऊटमधील ओपन स्पेस जागा ताब्यात घेऊन कंपाऊंड करणे व विविध महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली व प्रामुख्याने नगर पंचायतने आपल्या मालकीची जमीन ताब्यात घेऊन त्या ठिकाणी विकासात्मक कामे करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला लाभ देण्यात यावा, असे निर्देश दिले. या बैठकीत नगर अध्यक्षा जयश्री वायलालवार, नगर पंचायत मुख्याधिकारी बेंबरे, नगर पंचायत बांधकाम सभापती वैभव भिवापुरे, नगरसेवक आशीष पिपरे, नगरसेविका गीताताई सोरते अभियंता कारेकर व पदाधिकारी
कार्यकर्ते उपस्थित होते.