केंद्रीय मंत्री पुरुषोत्तमजी रूपाला यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे आवाहन

110

– केंद्रिय पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री यांच्या उपस्थितीत २० एप्रिल रोजी फंक्शन हॉल गडचिरोली येथे दुपारी १ वा. भाजपा कार्यकर्ता मेळावा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : केंद्रिय पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तमजी रुपाला बुधवार, दिनांक २० एप्रिल रोजी सकाळी गडचिरोली येथे येणार असून त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्याला गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या मेळाव्याला राज्याचे माजी मंत्री संजयजी कुंटे, खासदार अशोकजी नेते, आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.

सदर मेळावा २० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता चामोर्शी रोडवरील फंक्शन हॉल येथे आयोजित करण्यात आला असून कार्यकर्त्यांनी वेळेपूर्वी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले आहे.