माजी आमदार तथा महासचिव डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्या पाठपुराव्यामुळे रेगडी ते बोलेमपल्ली व रानमुल ते माडेमुल पुलांना मंजुरी

91

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुका व एटापल्ली तालुक्यातील सीमेमधून जाणा-या दिना नदीवर पुल नसल्याने पावसाळयामध्ये गडचिरोलीवरुन गडचिरोली – चामोर्शी व घोट परिसरातील नागरीकांना एटापल्ली जाण्यास जवळपास 90 किमीचे अंतर रेगडी – बोलेपल्ली मार्गावरुन गेल्यास कमी होत होते. परंतु रेगडीच्या दिना नदीवर पुल नसल्याने या नागरिकांना जाण्यास अडथळा निर्माण होत होता. याबाबत गडचिरोली, चामोर्शी, घोट, रेगडी, देवदा, बोलपल्ली व एटापल्ली या भागातील नागरिकांना तसेच विविध वृत्तपत्रातून रेगडी-देवदा पुल बांधण्याची मागणी करीत होते. परंतु तत्कालीन लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा न केल्यामुळे वरील जनतेंनी माजी आमदार तथा महासचिव महा. प्रदेश काँग्रेस कमिटी डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्याकडे निवेदन दिले असता त्यांनी महाविकास आघाडीचे बांधकाम मंत्री मा. अशोक चव्हाण साहेबांकडे सतत पाठपुरवा केल्यामुळे मा. बांधकाम मंत्री मा. अशोक चव्हाण साहेबांनी 22/23 या अर्थसंकल्पात रेगडी, देवदा, बोलेपल्ली पुलासाठी 18 कोटींंचा निधी मंजुर केलेला असून तसेच गडचिरोली तालुक्यातील रानमुल ते माडेमुल या मार्गासाठी 3.5 कोटी मंजुर केलेला आहे. तसेच गिलगाव, गजनगुडा, सावेला मार्गाचे खडीकरणासाठी 50 लक्ष रु., काळशी ते पुसेर मार्गाचे बांधकामासाठी रु. 50 लक्ष, धानोरा तालुक्यातील हेटी ते हेटी टोला रस्त्याचे बांधकामासाठी रु. 50 लक्ष, सोडे ते भुसुमकुडो रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणसाठी रु. 90 लक्ष, सिंसुर पोच मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी रु. 60 लक्ष, धानोरा ते पोकळकसा, बिनपुर, मुरगाव रस्त्याचे सुधारण्यासाठी रु. 30 लक्ष, ढोरगट्टा ते मासानदी रस्ता सुधारण्यासाठी रु. 30 लक्ष, पेंढरी ते रेचे रस्त्याचे सुधारण्यासाठी रु. 30 लक्ष, मासानदी ते मासानदी पोला रस्ता सुधारण्यासाठी रु. 30 लक्ष, हननपायली पोचमार्गाचे बांधकामासाठी रु. 30 लक्ष, पंराडा बुज ते भेन्डीकन्हार रस्ता सुधारण्यासाठी रु. 30 लक्ष, गट्टा ते हंराडा बुज रस्ता सुधारण्यासाठी रु. 30 लक्ष, मुरगाव ते रेंगादंडी रस्ता सुधारण्यासाठी रु. 30 लक्ष असे एकंदरीत 26 कोटी 90 लाख रुपयाचे काम मा. बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी व माजी आमदार तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्या सतत पाठपुराव्यामुळे गडचिरोली जिल्हयातल्या नागरिकांना दळणवळणाच्या सोई सुविधा सुरळीत व्हावे यासाठी मंजुर केल्यामुळे डाॅ. नामदेवराव उसेंडी यांनी मा. अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले तसेच डाॅ. उसेंडी यांच्या सतत पाठपुरावा केल्यामुळे गडचिरोली तालुका, धानोरा तालुका, चामोर्शी तालुका व एटापल्ली तालुक्यातील नागरीकांनी डाॅ. नामदेवराव उसेंडी यांचे आभार मानले व आनंद व्यक्त केला.