भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने पोषण पखवाडा अभियान

82

– इंदिरानगर, बोदली, लांजेडा येथील अंगणवाडी केंद्रांंमध्ये खाऊचे वाटप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महिला व बालकल्याण मंत्रालयाचा केंद्र सरकारच्या माध्यमातून सामाजिक न्याय पखवाडा पोषण अभियान संपर्ण देशात सुरु आहे. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली वतीने इंदिरानगर, बोदली व लांजेडा येथील अंगणवाडी केंद्रांंमध्ये भेट देवून सामाजिक न्याय पखवाडा पोषण अभियान साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मातृवंदना योजना लाभार्त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच गरोदर माता व लहान मुलाना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष योगीताताई भांडेकर, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी,माजी नगरसेविका लताताई लाटकर, अलकाताई पोहनकर, रश्मी बानमारे, कोमल बारसागडे, पुनम हेमके, अंगणवाडी सेविका अर्चना खेवले, हसीना शेख, विद्या नैताम, सौ. भुरसे तसेच आशा वर्कर व अंगणवाडी मदतनीस उपस्थित होते.