चातगाव येथे शिवप्रतिष्ठान नवयुवक कला मंडळ यांच्या सौजन्याने लावणी दुय्यम जंगी मुकाबला कार्यक्रमाचे आयोजन

100

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव येथे 27/02/2022 रोजी शिवप्रतिष्ठान नवयुवक कला मंडळ यांच्या सौजन्याने लावणी दुय्यम जंगी मुकाबला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभर बळीराजा शेतात राबतो. शेतीची मळनी होताच ग्रमीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांच्याच एक भाग म्हणून चातगाव येथे शिवप्रतिष्ठान नवयुवक कला मंडळ यांच्या सौजन्याने “लावणी दुय्यम जंगी मुकाबला” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार होते. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुुणे म्हणून लाभलेले राजू शेनमारे, राजुभाऊ जिवाणी, यादवजी लोहबरे, राहुल मड़ावी, संदीप कुमरे, पिटाले, कवडूजी धंदरे, राजुभाऊ ठाकरे, कोवे साहेब, शामराव उइके, संजय शेंडे, झाड़े साहेब, कैलास सिडाम, स्वप्निल कोठारे, तसेच शिवप्रतिष्ठान नवयुवक कला मंडळ चातगावचे सदस्य विशाल मड़ावी, कृष्णाा दुमाने, नेताजी गेडाम, संदीप नरताम, रमेश सिडाम, चंद्रशेखर पेंदाम, नितेश मलोडे, अमित दुमाने, आयुष मड़ावी, अशोक सिडाम, अतुल मेश्राम, दीपक सुरपाम, निखिल कोवे, अजिंक्य कुमरे, नरेंद्र गेडाम, जितेंद्र आत्राम, राहुल सयाम यांच्यासह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.