मेळाव्याच्या माध्यमातून समाजाची जागृती करणे काळाची गरज : महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे

171

– श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त आरमोरी येथे तेली समाज मेळावा

– जेष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ३८ टक्केच्या वर ओबीसी समाज आहे. तरीपण ओबीसी समाज बांधवांची नोकर भरती बंद झालेली आहे. राजकीय आरक्षण आता संपुष्टात आलेला आहे. मागासवर्गीय आयोगाने महाराष्ट्र शासनाला सुप्रीम कोर्टासाठी सादर करण्यात येणाऱ्या इम्पिरीअल डाटामध्ये गडचिरोली व नंदुरबार जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण शुन्य प्रमाणात दाखविण्यात आले होते. परंतु महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेला संपूर्ण इम्पिरीअल डाटा हा चुकीचा आहे असे सांगितले. ओबीसी समाजाचे नव्याने सर्व्हे करून इम्पिरीअल डाटा सादर करण्यास सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र शासन व मागासवर्गीय आयोगाने नवीन ओबीसी समाजाचा सर्व्हे करताना गडचिरोली जिल्ह्यातील 40 टक्के ओबीसी समाजाचे उदा. तेली, कुणबी, माळी व ईतर समाजाचा समावेश करून इम्पिरीअल डाटा तयार करून पूर्ववत केंद्राप्रमाणे २७ टक्के राजकीय आरक्षण लागु करावे. असे न झाल्यास ओबीसी समाज बांधवांनी एकत्रित येवून रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी मेळाव्याच्या माध्यमातून समाजाची जागृती करणे काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांनी केले.
श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त तेली समाज मेळावा तसेच वधु-वर परिचय मेळावा, जेष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार व रक्तदान शिबिराचे आयोजन संताजी ग्राऊंड कोसा विकास केंद्रा जवळ, वडसा रोड आरमोरी येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तेली समाज बांधवांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन करताना प्रमोदजी पिपरे बोलत होते.
मेळाव्याला अध्यक्ष म्हणून किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाग्यवनजी खोब्रागडे उपस्थित होते. उद्घाटन महाराष्ट्र तेली समाज महासंघाचे अध्यक्ष बबनरावजी फंड, माजी जि. प. अध्यक्ष योगीताताई भांडेकर, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष (दक्षिण) प्रभाकरजी वासेकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे, प्राचार्य पी. आर. आकरे, मुखरूजी खोब्रागडे, भाष्करराव बोडणे, परसरामजी टिकले, डॉ. संजय सुपारे, विनोद बावनकर, दामजी नैताम, भाग्यलक्ष्मी खोब्रागडे, श्रीमती क्षीरसागर, श्रीमती जवंजाळकर, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मेळाव्याला मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदिप चापले यांनी केले. तर आभार रवींद्र वासेकर यांनी मानले. यावेळी जेष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याचे आयोजन संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ आरमोरीचे अध्यक्ष बुद्धाजी किरमे, उपाध्यक्ष रामभाऊ कुर्झेकर, सचिव देविदास नैताम, सहसचिव तुळशीरामजी चिलबुले, कोषाध्यक्ष विवेक घाटूरकर, द्वारकाप्रसाद सातपुते, शंकरराव बावनकर, महादेव भांडेकर, दिपक निंबकर, गजानन चिळगे, रविंद्र सोमनकर, आकाश चिलबुले, विलास चिलबुले, प्रतिभा जुवारे, हिराबाई कामडी, सुरेखा भांडेकर व श्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळचे सदस्य यांनी केले.