माजी जि. प. अध्यक्षा योगिताताई मधुकरजी भांडेकर यांचा वाढदिवस फळवाटप व वृक्षारोपणाने साजरा

85

– योगिताताई भांडेकर यांना दिल्या वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा कुरूड – विसापूर क्षेत्राच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या तथा भाजपा महिला आघाडीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षा योगिताताई मधुकरजी भांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त 19 फेब्रुवारी रोजी चामोर्शी तालुक्यातील आमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात फळवाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी योगिताताई भांडेकर यांना वाढदिवसाच्या व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. पुढील वाटचाल भरभराटीची जावो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला आमगाव (म.) येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष कोठारे, ग्रामपंचायत सदस्य भाऊराव देवतळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण वासेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रेमिलाताई बैस, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती वासेकर, आमगाव (म.) येथील डॉ. श्रीरामे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.