नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य पुरवठा करणा­ऱ्या नक्षल समर्थक टोळीचा पर्दाफाश

148

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य पुरवठा करणा­ऱ्या नक्षल समर्थक टोळीचा पर्दाफाश 19/02/2022 रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील मौजा भंगारामपेठा गावात पोउपनि सचिन घोडके यांच्या नेतृत्वात उपपोस्टे दामरंचा पोस्टे पार्टी व शिघ्र कृती दल (क्युआरटी) दामरंचाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना तेलंगणामधून दामरंचामार्गे छत्तीसगड येथे वाहतुक करीत असलेल्या 4 इसमांकडून 10 नग कार्डेक्स वायरचे बंडल एकुण 3500 मीटर लांबीचे व ईतर नक्षल साहित्य जप्त करण्यात यश आले.

नक्षलवादयांना सदरचे साहित्य पुरवठा करणा­ऱ्यांचे नाव 1) राजु गोपाल सल्ला वय 31 वर्षे रा. आसिफनगर, एनटीआर कॉलनि, जि. करीमनगर (तेलंगणा) 2) काशिनाथ ऊर्फ रवि मुल्ला गावडे वय 24 वर्षे रा. भंगारामपेठा ता. अहेरी 3) साधु लच्चा तलांडी वय 30 वर्षे, 4) मोहम्मद कासिम शादुल्ला रा. एनटीआर तामिल कॉलनि, बाबुपेठ, आसिफनगर जि. करीमनगर (तेलंगणा) 5) छोटु ऊर्फ सिनु मुल्ला गावडे रा. भंगाराम पेठा ता. अहेरी असे असुन, यातील 4 आरोपींना घटनास्थळावरुन जवानांकडून पकडण्यात आले असून, मौजा भंगारामपेठा येथील रहीवासी असलेला 1 आरोपी नामे- छोटु मुल्ला गावडे फरार आहे. फरार आरोपीचा गडचिरोली पोलीस दलाकडुन कसुन तपास करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्हयामध्ये नक्षलवादी घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या बनावटी शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात. नक्षल समर्थकांकडुन जप्त करण्यात आलेल्या कार्डेक्स वायरद्वारे नक्षली बनावटीचे बीजीएल, हँडग्रेनेड, बॉम्ब आणि आयईडी तयार करण्यासाठी मोठया प्रमाणात वापर केला जातो. येत्या टिसीओसी सप्ताह दरम्यान सदर स्फोटकांचा नक्षलवाद्यांकडुन मोठया प्रमाणात वापर केला जाणार होता.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे (अभियान), अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा सुजितकुमार क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सचिन घोडके प्रभारी अधिकारी उपपोस्टे दामरंचा यांचे नेतृत्वात पार पडली.
सदर कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या जवानांचे कौतुक केले आहे. तसेच नक्षलवाद्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणा­या नक्षलसमर्थकांवर कडक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.