आष्टी- ईल्लूर जि. प. क्षेत्राचा सर्कल मेळावा संपन्न

125

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आष्टी – ईल्लूर जिल्हा परिषद सर्कलचा कार्यकर्ता मेळावा आज 20 फेब्रुवारी रोजी भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाा. यावेळी मेळाव्याला प्रामुख्याने भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चाचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख बाबुरावजी कोहळे, भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्रजी ओल्ल्रालवार, आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, चामोर्शीचे तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, भाजपचे माजी जि. प. सदस्य प्रकाशजी कुकुडकर व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्यात शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुखांना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत घवघवीत यश संपादन करण्यासाठी नियोजन करून, परिश्रम घेऊन बूथ मजबूत करण्यासाठी व शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यन्त पोहचविण्यासाठी कामाला लागण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्याला तालुक्याचे सर्व पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.