आगामी जि. प. निवडणुकीसाठी पक्षाचे संघटन मजबूत करा : खासदार अशोक नेते यांचे आवाहन

80

– गोमणी – सुंदरनगर जि. प. क्षेत्राचा सर्कल मेळावा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पक्ष हा देशातील एक नंबरचा पक्ष आहे. आजच्या स्थितीत पक्षाची सदस्यसंख्या 10 कोटींच्या घरात आहे. भाजपा देशातला सर्वात मोठा पक्ष असल्याने पक्षाची ध्येयधोरणे, उद्देश सर्वसामान्य जनतेपर्यन्त पोहचविणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून त्यांना सदर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा तसेच आगामी जि. प. व पं. स. निवडणुकीची तयारी करून पक्षाचे संघटन वाढवून बूथ रचना मजबूत करण्यावर भर द्या, असे प्रतिपादन अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार अशोक नेते यांनी केले. भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मुलचेरा तालुक्यातील गोमणी- सुंदरनगर जिल्हा परिषद सर्कलचा कार्यकर्ता मेळावा आज 20 फेब्रुवारी रोजी भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मेळाव्याला प्रामुख्याने भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चाचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख बाबुरावजी कोहळे, भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्रजी ओल्लालवार, आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य रेखाताई डोळस, मुुलचेरा तालुक्याचे अध्यक्ष प्रकाश दत्ता, जिल्हा सचिव सुभाष गणपती, तालुका महामंत्री विधान वैद्य व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्यात शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुखांना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत घवघवीत यश संपादन करण्यासाठी नियोजन करून, परिश्रम घेऊन बूथ मजबूत करण्यासाठी व शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यन्त पोहचविण्यासाठी कामाला लागण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्याला तालुक्याचे सर्व पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.