शिवछत्रपतींचा आदर्श प्रत्येकांनी जोपासावा : शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार

117

– मुरमाडी येथे श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संघटनेच्या वतीने शिवजयंती सोहळा साजरा

विदर्भ क्रांंती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्रच नव्हे तर साऱ्या देशवासीयांना ज्यांचा अभिमान आहे असे रयतेचे राजे, शुरवीर, पराक्रमी, बंधूभावाची शिकवण देणारे आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या कर्तबगार मावळयांना सोबत घेऊन गनिमी काव्याने शत्रूला नामोहरण करणारे राजे म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ‘शिवछत्रपती शिवाजी महाराज’ होय. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, त्यांची शिकवण, आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून प्रत्येकांनी त्यांचा आदर्श जोपासून वाटचाल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.

१९ फेब्रुवारी रोजी गडचिरोली तालुक्यातील मुरमाडी येथे श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संघटनेच्या वतीने शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनीय भाषणात अरविंदभाऊ कात्रटवार बोलत होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, रयतेचा राजा कसा असावा याचा ‘पायंडा’ छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला. शिवाजी महाराज यांचा इतिहास समजून तो आपल्या जीवनाशी जुळवून घेता आला पाहिजे. त्यातूनच आयुष्याची खरी लढाई लढण्यासाठी आपण सिध्द होऊ शकतो. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना असंख्य अडचनी आल्यातरी प्रत्येक अडचनीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराज पुढे गेले. जिद्द, चातुर्य आणि बुध्दीच्या वापर करून विजय प्राप्त करता येते, हे शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांनी साऱ्या जगाला दाखवून दिले आहे.
माता जिजाऊं साहेबांच्या पोटी जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वात एकप्रकारे जादू होती. कितीही प्रतिकूल परिस्थीती असली तरी हसत – हसत त्या परिस्थीतीला सामोरे जाऊन संकटावर मात करता येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेवर जिवापाड प्रेम करून जाती- पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. त्यांचा इतिहास, त्यांचे कार्य आणि आदर्श जोपासून आपल्या जिवनाशी जळवून घेता आले तरच आयुष्याची लढाई जिंकता येते, असेही शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा निजोजन समितीचे सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सदस्य रामरतन गोहणे, कविश्वर बनपूरकर, प्रल्हाद म्हशाखेत्री, यादवजी लोहबरे, हेमंत गेडाम, सचिन भुसारी, खुशाल नेवारे, चांगदेव कन्नाके, अविनाश आवारी, गेडाम, चुधरी, चुधरी, गणेश दहेलकर, धनंजय डोईजड, मनोहर भुसारी, गिरिधर बोरकर, कवडुजी भुसारी, वासुदेव देशमुख, राजे शिव छत्रपती स्मारक संघटना मुरमाडीचे सदस्य विकास तिवाडे, मुकेश आवारी, फिरोज कोहपरे, खुशाल भुसारी, भाऊराव डोईजड, मोरेश्वर आवारी, सचिन भुसारी ताजेश्र्वर भुसारी, अजय चंडणखेडे, गोविंदा आवारी, अशोक भुसारी, अशोक डोईजड, यशवंत डोईजड, रुपेश आवारी, रूपम निलेकर, दिलीप कोहपरे, मुरलीधर डोईजड, राकेश शेंडे, संदीप शिवणकर, वैभव आवारी, कुमोद भुसारी, चंदु डोईजड, रवींद्र आवारी, हंसराज कोहपरे, लुमाजी भोयर, विनोद नरुले यांच्यासह मुरमाड़ी गावातील शेकडो माता, भगिनी व गावकरी उपस्थित होते.