राजेशाहीमध्येही लोकशाही निर्माण करणारा जानता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज : महेंद्र ब्राम्हणवाडे

90

– इंदाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राजेशाहीमध्ये लोकशाही निर्माण करणारा जानता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळे लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या परंतु हुकूमशाही गाजवणाऱ्या केंद्रातील सरकारने छत्रपतींचा आदर्श घ्यावा तेव्हाच लोकांचे कल्याणकारी राज्य निर्माण होईल शकेल, असे मत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केले. इंदाळा येथे स्वराज्याचे संंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

यावेळी उद्घाटक म्हणून शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार उपस्थित होते. द्वीपप्रज्वलन जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हानिरीक्षक डॉ. नामदेवराव किरसान, डॉ. नितीन कोडवते यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शन म्हणून साईनाथ विद्यालय येवली येथील प्रा. कुत्तरमारे, मुख्य अतिथी म्हणून काँग्रेस जेष्ठ नेते दामोदर मंडलवार, सरपंच मनोज जेंगटे, घनश्याम कोलते, ज्ञानेश्वर बघमारे, अनिल करंगे, विवेक मून यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक व मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.