Home गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांचा 26 ला पदग्रहण सोहळा व शेतकरी मेळावा

काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांचा 26 ला पदग्रहण सोहळा व शेतकरी मेळावा

22

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : काँग्रेसचे नवनियुक्त गडचिरोली जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजित मारोतराव कोवासे यांचा पदग्रहण सोहळा आणि शेतकरी मेळावा मंगळवार, 26 मे रोजी गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. राम मेश्राम, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार व इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या घरासमोरील पटांगणात आयोजित या कार्यक्रमाला भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी खासदार मारोतराव कोवासे, आ. अभिजित वंजारी, आ. रामदास मसराम, आ. सुधाकर अडबाले, महाराष्ट्र प्रभारी कुणाल चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आदी उपस्थित राहणार असल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेला बंडू शनिवारे, पुष्पलता कुमरे, रजनीकांत मोटघरे, रूपेश टिकले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, नगरसेवक श्रीकांत देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

नवनियुक जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजित कोवासे यांच्या या पदग्रहण, नागरी सत्कार सोहळा व शेतकरी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदेश काँग्रेसचे सचिव पंकज गुड्डेवार, माजी जि. प. सदस्य ॲड. राम मेश्राम, माजी नगरसेवक बंडू शनिवारे आदींनी केले.

error: Content is protected !!