खा. प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त नमाद महाविद्यालयात कर्करोग जनजागृती कार्यशाळा

88

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया (प्रतिनिधी) : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कर्करोगावर जनजागृती कार्यशाळा नुकतीच पार पडली. कर्करोग थांबवा मोहिमेचे उपसंचालक डॉ. कमल गौतम यांनी मार्गदर्शन केले.
गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्रजी जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात नमाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात सेमिनार हॉल येथे आयोजित कर्करोग जनजागृती कार्यशाळेचे उदघाटन धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांनी केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शारदा महाजन तर प्रमुख अतिथी म्हणून पी पी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र निकोसे, एस एस गर्ल्स महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. ललिता रॉय चौधरी व कर्करोग थांबवा मोहिमेचे उपसंचालक, मार्गदर्शक डॉ. कमल गौतम उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात डॉ. कमल गौतम म्हणाले, जीवनात निरोगी राहण्यासाठी सुरक्षा हाच सर्वोत्तम पर्याय आहे. परंतु अनेकदा दुर्लक्ष केल्याने आजार होतात. कर्करोग हा सुद्धा दोन कारणामुळे होतो. एक अज्ञानता आणि दुसरा दुर्लक्ष. कर्करोग हा २०० प्रकारचा आहे. “इन्सान भी क्या चीज है” या दलाई लामा यांच्या वाक्याचा संदर्भ देत कर्करोगाची गंभीरता समजावून सांगितली. कर्करोगावर उपाय असलेल्या केमोथेरपीचे फायदे आणि नुकसान यावर सविस्तर मार्गदर्शन केले. आरोग्य हीच संपत्ती आहे असे सांगत डॉ. कमल गौतम यांनी प्रत्येकाने आपल्या स्वास्थ्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी या कर्करोग जनजागृती कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. डॉ. अंजन नायडू, कार्यशाळेच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. शारदा महाजन, प्राचार्य डॉ. राजेंद्र निकोसे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे संचालन डॉ. परवीन कुमार, प्रास्ताविक डॉ. अंबादास बाकरे तर आभार डॉ. सरिता उदापूरकर यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. तृप्ती पटेल, डॉ. भावेश जसानी, डॉ. किशोर वासनिक, डॉ. योगेश बैस, प्रा. उर्वील पटेल, डॉ. उमेश उदापुरे, डॉ. मुनेश ठाकरे, डॉ. गिरीश कुदळे, डॉ. खुशबू होतचंदानी, डॉ. अश्विनी दलाल, डॉ. रत्ना बिश्वास, डॉ. सुनील जाधव, प्रा. नरेश भुरे, डॉ. कपिल चौहान आदींसह महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेला बहुसंख्य महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.