विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी येथील प्रतिष्ठीत नागरिक तथा भाजपाचे गडचिरोली जिल्हा सचिव तथा मन की बात कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक आनंदभाऊ गण्यारपवार यांचे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी जवळील रनमोचन फाट्यावर अपघाती निधन झाले. खासदार अशोक नेते यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली व अपघात ग्रस्त वाहनांची पाहणी केली. तदनंतर ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात जाऊन अपघातात जखमी जि. प. सदस्य अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व वैद्यकीय अधिकारी यांना योग्य ते उपचार त्वरित करण्यास सांगितले. कुटुंबियांना धीर दिला. तसेच ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन मृतक आनंदभाऊ गण्यारपवार यांच्या पार्थिव देहावर यथशिग्र शवविच्छेदन करण्याचे निर्देश डॉक्टरांना दिले. तेथील डाँक्टरांनी याची दखल घेत वेळीच शवविच्छेदन करून प्रेत कुटुंबियांच्या ताब्यात दिले. याप्रसंगी माजी आमदार प्रा. अतुल देशकर, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, भाजयुमोचे प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, माजी पं. स सदस्य रेवनाथ कुसराम व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.