जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नागेपल्ली येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

98

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत नागेपल्ली येथे मिलिंद खोंड यांच्या घरापासून ते शाम राऊत यांच्या घरापर्यंत सिमेंट – कांक्रीट रोडचे उ्द्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून यासाठी जि. प. अध्यक्ष यांच्याकडे या मागण्या रेटून धरल्या असता जि. प. अध्यक्ष यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजुरी देऊन सदर कामाचे उद्घाटन केले आहे. या उद्घाटन सोहळ्याला अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, उपसभापती गीताताई चालुरकर, पं. स. सदस्या योगीता मोहुर्ले, नागेपल्लीचे सरपंच लक्ष्मण कोडापे, उपसरपंच रमेश शानगोंडावार, ग्रा. पं. सदस्य फिनिक्स गिद्द, ज्योती ठाकरे, गुलाब सोयाम, अशोक रापेलिवार, विशाल रापेलीवार, प्रशांत गोडसेलवार, कार्तिक तोगम, प्रकाश दुर्गे, राकेश सड़मेक आदी नागरिक उपस्थित होते.