– सिंदेवाही (मालेवाडा) येथे ३ दिवसीय श्रीमद भागवत सप्ताह
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सिंदेवाही (मालेवाडा) येथील हनुमान मंदिराच्या भव्य आवारात २७ जानेवारी २०२२ ते २९ जानेवारी २०२२ ३ दिवसीय भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
भागवतकार महर्षी मुक्त शंकर चैतन्य परिब्राजक के पदरज स्वामी श्री रामचैतन्य परिब्राजक महाराज सार्वभौम सिद्धांत विश्व जागृती समिती (डीहीपारा) झाडीखैरी यांचे अमृतमय वाणीद्वारे गुरुगीता श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यासाठी सिंदेवाही (मालेवाडा) ग्रामवासीयांनी कीर्तन फेरीत मोठ्या संख्येने भाग घेतला. श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाची सुरुवात २७ जानेवारी २०२२ रोज गुरुवारला सकाळी ११ वाजता घटस्थापना, दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत भागवत कथा व रात्रो ७ ते ९ वाजतापर्यंत भागवत कथा, २८ जानेवारी २०२२ शुक्रवारला सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत जैसिंगटोला/उपदल्ली हरी भक्तगण यांच्या उपस्थितीत हरिपाठ संपन्न, दुपारी २ ते ४ व ७ ते ९ वाजेपर्यंत भागवत कथा व २९ जानेवारी २०२२ शनिवारला सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत हरिपाठ चरवीदंड/ पालापुंडी सर्व भक्तगणाच्या उपस्थित संपन्न झाले. सकाळी ११ ते दुपारी १ वाजतापर्यंत भागवत कथा व गोपालकाला, महाप्रसादाचे आयोजन केले. महाप्रसाद वितरण होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे, आवाहन यावेळी आयोजकांनी केले होते. सिंदेवाही गावातील ग्रामस्थ परिसरातील भविकभक्त एकत्रित येऊन सहभागी झाले. भागवत सप्ताहाच्या निमित्याने संपूर्ण गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेे.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ. नामदेवराव उसेंडी म्हणाले की, साधू संत येति घरा. तोच दिवाळी दसरा. आरोग्य हीच खरी संपत्ती असून प्रत्येकांनी आपल्या तब्बेतीची काळजी घेणे गरजेचे आहे. मानवी जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञानासोबत आध्यात्मिक उन्नतीसाठी हरिनाम सप्ताहाचे आयोजनही तितकेच महत्वाचे आहे. माणसांनी माणसाप्रमाणे जगावं गावातील तरुणांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आपल्या गावासाठी जेवढे काही काम करता येईल तेवढे करावे.
यावेळी कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, म्हणाले की, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग जर कोणी दाखवत असेल तर ते भागवत सप्ताहाच्या माध्यमातून व त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून होत असतो.
विशेष अतिथी माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन पा. नाट, जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, जि. प. सदस्य प्रभाकरजी तुलावी, जि. प. सदस्य श लताताई पुंगाटे, ग्रा.पं. सरपंच अंतकला मडावी, सेवानिवृत्त पीएसआय गडचिरोली करवके, दिनेशजी गुप्ता चंद्रपूर, काशिनाथ पा. दाजगाये, यादवजी लोहंबरे मोहटोला, व्यवस्थापक वाढईजी मालेवाडा, डोमाजी लाकूडवाडे बोरी, रवींद्र मारगाये, माजी सरपंच बाळकृष्ण शेडमाके, राधेश्याम सिडाम, सखारामजी नैताम, जैमसी, आनंदराव डोकरमारे आरमोरी, नामदेवजी गावडे, वैभव गुज्जनवार, विलास चांभारे, बाबुराव बावणे, नवनाथ आंबेकर, आत्माराम डोकरमारे, देवाजी शेंडे महाराज, सुभाष गुंडरे, श्री. ह.भ. प. मडावी महाराज, लक्ष्मण डोकरमारे, सोमेश्वर किचक, जनकराम टिकले, प्रशांत टिकले, भागवत टिकले, प्रकाश डोकरमारे, ज्ञानेश्वर किचक, अरविंद डोकरमारे, श्रीकांत डोकरमारे, तुळशीराम तुलावी, आसाराम, ज्ञानेश्वर सोनुले, रवींद्र लोहंबरे, ओमनाथ चोपडे, महेश नैताम, ईश्वर उईके, गोपाल करमकर, श्रीकृष्ण डोकरमारे, रोहिदास वाटगुरे, नामदेव डोकरमारे, अशोक डोकरमारे आदी बहुसंख्य सिंदेवाही, मालेवाडा, जैसिंगटोला, उपदल्ली, पालापुंडी देवसरा परिसरातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन मारगाये यांनी केले. आभार प्रदर्शन जनतराम टिकले यांनी केेले.