विधानसभा क्षेत्रातील घरकूलबाबत अन्याय झालेल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय न दिल्यास गडचिरोली जिल्ह्यात विराट आंदोलन : आमदार डॉ. देवराव होळी

76

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील शेकडो गावातून दररोज घरकूल समस्याबाबत वारंवार सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचे तक्रारी येत होत्या. या तक्रारीची दखल घेऊन गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी अचानक चामोर्शी तालुक्यातील मौजा विष्णुपूर येथे सदिच्छा भेट दिली व येथील नागरिक यांच्यासोबत संवाद साधला व येथील नागरिक यांनी राज्य सरकारबाबत विविध समस्या मांडले. यात प्रामुख्याने नागरिकांनी घरकुलाबाबत नाराजी व्यक्त केली व सांगितले.
तालुक्यातील जे गोरगरीब जनता घरकूल योजनाकरिता पात्र लाभार्थी आहेत ते मोठ्या संख्येने वंचित आहेत.
जे लाभार्थी त्यांच्याकडे साधे सायकल सुद्धा नाही त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहेत, ज्या नागरिकांकडे शेती नाही, त्यांचे मोठे उद्योग व्यवसाय सुरू आहेत, असे दाखवण्यात आले आहे व भूमिहीन शेतमजूर यांना मोठे
शेतकरी दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी वंचित आहेत व अनेक गावात घरकूल योजनेत मोठा घोळ झाला आहे. तमाम तालुक्यातील घरकूल योजनेचा चौकशी करण्यात यावी व समस्त पात्र लाभार्थी यांना घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांनी केली.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी गावातील काही निराधार व दिव्यांग व्यक्तींना सुद्धा सदिच्छा भेट दिली व उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. गडचिरोली विधानसभा मतदारसंघात कोणत्याही घरकूल पात्र लाभार्थी यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही व राज्य सरकारने मतदारसंघातील घरकूल लाभार्थी यांना लवकरात लवकर न्याय न दिल्यास गडचिरोली विधानसभा मतदारसंघात विराट आंदोलन करण्याचा इशाराही आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिला. यावेळी
भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, भाजपा नेते किरण मल्लिक, महानंद हलदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.