भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी ‘मन की बात’ कार्यक्रम

95

– पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा ‘मन की बात’ च्या माध्यमातून जनतेशी संवाद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशाचे पंतप्रधान मा. नरेन्द्रजी मोदी ‘मन की बात’ च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला असून गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा तालुका स्तरावर तसेच शहरात कार्यक्रम घेण्यात आले. आज भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मन की बात’ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख तसेच भाजपा कार्यकर्ते ‘मन की बात’ कार्यक्रमाला उपस्थित होते.