गडचिरोली जिल्हयात आज 224 कोरोनामुक्त, नवीन 278 कोरोनाबाधित

92

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 1221 कोरोना तपासण्यांपैकी 278 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 224 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 33707 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 31619 आहे. तसेच सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 1335 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 753 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.81 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.96 टक्के तर मृत्यू दर 2.23 टक्के झाला आहे.

आज नवीन 278 बाधितांंमध्ये गडचिरोली तालुक्यातील 95, अहेरी तालुक्यातील 1, आरमोरी तालुक्यातील 6, भामरागड तालुक्यातील 3, चामोर्शी तालुक्यातील 40, धानोरा तालुक्यातील 25, एटापल्ली तालुक्यातील 11, मुलचेरा तालुक्यातील 39, सिरोंचा तालुक्यातील 9, कोरची तालुक्यातील 5, कुरखेडा तालुक्यातील 30 आणि वडसा तालुक्यातील 14 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 224 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 117, अहेरी तालुक्यातील 10, आरमोरी तालुक्यातील 9, भामरागड तालुक्यातील 5, चामोर्शी तालुक्यातील 23, धानोरा तालुक्यातील 18, एटापल्ली तालुक्यातील 3, मुलचेरा तालुक्यातील 9, सिरोंचा तालुक्यातील 2, कोरची तालुक्यातील 2, कुरखेडा तालुक्यातील 9 आणि वडसा तालुक्यातील 17 जणांंचा समावेश आहे.