खासदार अशोक नेते यांनी स्वतः कचरा गोळा करणारे वाहन चालवून केले वाहनांचे लोकार्पण

124

– मुरखळा (नवेगाव) येथे 15 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत खरेदी केलेल्या वाहनांचा पार पडला लोकार्पण सोहळा

– आमदार डॉ. देवराव होळी, सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलासराव दशमुखे यांची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : प्रजासत्ताक दिनानिमित्त आज, 26 जानेवारी 2022 रोजी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते गडचिरोली तालुक्यातील मुरखळा (नवेगाव) ग्रामपंचायत येथे 15 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत कचरा गोळा करण्याचे काम करण्यासाठी खरेदी केलेल्या दोन नवीन वाहनांचे लोकार्पण करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलास पाटील दशमुखे, ग्रामपंचायत सरपंच दशरथ चांदेकर, उपसरपंच राजू खंगार, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी कचरा गोळा करणारे वाहन चालक यास वाहनाची चाबी देण्यास सांगितले व स्वतः सदर वाहन चालवून आज लोकार्पण केले. यावेळी वाहनात सभापती मारोतराव इचोडकर स्वतः बसून होते व दुसऱ्या वाहनाची चाबी पंचायत समितीचे उपसभापती विलास पाटील दशमुखे यांनी आपल्या हातात घेतले व स्वतः वाहन चालवले. यावेळी वाहनात आमदार डॉ. देवरावजी होळी हे स्वतः बसून होते.
यावेळी नागरिकांंमध्ये एकच चर्चा होती की, गेल्या इतक्या वर्षांत प्रथमच खासदार अशोक नेते यांनी हातात वाहनांचे स्टेरींग घेतले होते.