२६ जानेवारी १९५० ला आपला देश संविधान स्वीकृत केल्यानंतर एक लोकतांत्रिक सार्वभौम आणि गणराज्य बनला : भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे

119

– संघर्षनगर येथे भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शहरातील संघर्षनगर येथे भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी २६ जानेवारी १९५० ला आपला देश संविधान स्वीकृत केल्यानंतर एक लोकतांत्रिक सार्वभौम आणि गणराज्य बनला असल्याचे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी केले.

ध्वजारोहण कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, भाजपा शहर अध्यक्ष तथा माजी पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, माजी नगरसेवक केशव निंबोड, महिला आघाडी शहर महामंत्री तथा माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, सामाजिक कार्यकर्ते विलास नैताम, देवाजी लाटकर, रोशनी बानमारे, पूनम हेमके, संजय बोधलकर, राजकुमार प्रधान, सोमेश्वर भोयर, गिरीश मुरमुरवार, हिरालाल चिचघरे, धारा बन्सोड, वेणूताई लाटकर, गणेश बोबाटे व संघर्षनगर येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.