गडचिरोलीतील सात पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलिस पदक’ जाहीर

202

– पोलीस अधिकाऱ्यांचा कार्याचा गौरव

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पोलीस दलात कार्यरत असताना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुध्दा गडचिरोली पोलीस दलातील ७ अधि./ अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व १ पोलीस अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे. राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पोउपनि भरत चिंतामण नागरे, सहा. फौ. गोपाल मनिराम उसेंडी, पोहवा निलेश्वर देवाजी पदा, पोहवा संतोष विजय पोटावी, नापोशि दिवाकर केसरी नरोटे, नापोशि महेंद्र गणू कुलेटी, पोशि संजय गणपती बाकमवार तसेच सहा.फौ. बस्तर लक्ष्मण मडावी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहेत.