गडचिरोलीत जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुक्यात कोविड मदत कक्षाची स्थापना

85

कोविडबाबत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी घेतला तालुकास्तरीय आढावा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या पाहता संपूर्ण जिल्हयात कोविड संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना कार्यान्वीत करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मदतीकरीता व प्रशासनाच्या सनियंत्रणाकरिता प्रत्येक तालुक्यात व संपुर्ण जिल्हयासाठी असे मिळून एकुण 14 विविध कोविड नियंत्रण मदत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात रूग्णांसाठी कोविड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात येत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी तहसीलदार, गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते.

बारा तालुक्यात बारा ठिकाणी तालुका कोविड नियंत्रण कक्ष, जिल्हयाच्या ठिकाणी जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष व सामान्य रूग्णालयात मदत केंद्र अशा 14 नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली.

तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष व त्यांचे संपर्क क्रमांक

अहेरी – 07133-295001, भामरागड – 07138-254028, 9421008827, 9421008807, चामोर्शी – 07135-295240, धानोरा – 8275600746/ 8275114890, एटापल्ली- 9404933065, 7588442412, कोरची – 8275932599, सिरोंचा – 07131-233129, गडचिरोली- 07132- 233019, 9209155955, 9673198415, आरमोरी – 07137-266508, 9209151047, वडसा- 07137- 272400/9404128880, मुलचेरा – 8275879981, 07135-271033, कुरखेडा – 07139-245199,  जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष 07132-222030/ 222031/9423911077, मदत केंद्र सामान्य रूग्णालय, गडचिरोली 07132-222340/222191 या संपर्क क्रमाकांवर सकारात्मक रूग्णांचा पाठपुरावा करणे, रूग्णांना गृहविलगीकरणामधील आवश्यक मदत पुरविणे, भरती रूग्णांबाबत नातेवाईकांना माहिती देणे तसेच रूग्णासाठी बेडची उपलब्धता अशा सुविधा तालुकानिहाय त्या त्या कोविड नियंत्रण कक्षाद्वारे दिल्या जाणार आहेत. तर जिल्हा कोविड नियंत्रण कक्षामधून नागरिकांना नमुना पॉझिटीव आल्यास कळविणे, तक्रार निवारण, बेडची उपलब्धता तसेच रूग्णांबाबतची माहिती दिली जाणार आहे.

तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वीत करण्यात येत आहेत. यामध्ये जिल्हा मुख्यालयी यापुर्वीच सुरू असलेले दोन डिस्ट्रीक्ट कोविड हॉस्पीटल व तालुकानिहाय सहा डिस्ट्रीक्ट कोविड केअर हॉस्पीटलची क्षमता वाढविण्यात येत आहे. बाधित रूग्णांना आवश्यक सेवा देण्यासाठी तालुक्यात 13 ठिकाणी कोविड केअर सेंटरची स्थापना पुन्हा करण्यात येत आहे. या कामांच्या तयारीबाबत काल जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आढावा घेतला.