चामोर्शी शहराच्या विकासाकरिता भाजपाच्या उमेदवारांंना मतदान करा : खा. अशोकजी नेते

117

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गोर-गरीब, दलित, पिडीत, शोषित, ओबीसी, आदिवासीच्या विकासाकरिता कार्य करणाऱ्या भाजपा पक्षाच्या उमेदवारांना या न. पं. निवडणुकीत प्रचंड मताने निवडून द्या, असे आवाहन खासदार अशोकजी नेते राष्ट्रीय महामंत्री, भाजपा जनजाती मोर्चा यांंनी चामोर्शी येथील न. पं. निवडणूक दरम्यान वाळवंटी चौक, गोंड मोहल्ला, ढिवर मोहल्ला येथील जाहिर सभेत केले.
प्रदेश सरचिटणीस भाजपा STM, महाराष्ट्र प्रकाश गेडाम म्हणाले, मा. सुप्रीम कोर्टाने 2 वर्षी पुर्वी महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा इंम्पेरीकल डेटा देऊन ओबीसींंचे राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सूचना केली होती. पण ओबीसी आरक्षण विरोधी महाविकास आघाडी सरकारने कोनतीच कार्यवाहि केली नाही. त्यामुळे ओबीसींंचे राजकीय आरक्षण रद्द झाले व आज जनरलमधून धनाड्य लोकांंना आव्हान देत ओबीसींंना न. प. निवडणुका लढवाव्या लागत आहेत. 340 कलमान्वये 1952 पासून आजपर्यंत ओबीसी आरक्षण लागू न करणाऱ्या व महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण घालवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला दणका देण्याची हीच वेळ आहे. ओबीसींंनी हिशेब चुकता करावा, असे आवाहन केले.
प्रास्ताविक ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस आशीषजी पिपरे यांंनी केले. आभार भाजपा ता. अध्यक्ष दिलीपजी चलाख यांंनी मानले. कार्नर सभेला मंचावर जि. प. कृषी सभापती प्रा. रमेशजी बारसागडे, स्वप्नीलजी वरघंटे, प्रदेश सदस्य भाजयुमो महाराष्ट्र, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहणकर, आनंदजी गण्यारपवार, भाजपा जिल्हा चिटणीस, उमेदवार सोनालीताई पिपरे, सोपान नैताम, साखरे, मानिकजी कोहळे, श्रावणजी सोनटक्के उपस्थित होते.