चामोर्शी शहराच्या विकासासाठी भाजपाला निवडून द्या : आमदार डॉ. देवरावजी होळी

94

– चामोर्शी येथे भाजपा उमेदवा कॉर्नर सभा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्यातील जनतेची फसवणूक करुन सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून राज्य अधोगतीकडे चाललं आहे. त्यामुळे या आघाडी सरकाराला धडा शिकविण्याची ही योग्य वेळ आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने नेहमीच विकासाला महत्त्व दिले आहे. त्यामुळे विकासाला महत्त्व देणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील उमेदवारांनाच आपण निवडून द्यावे, असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी चामोर्शी येथील संताजी नगर प्रभाग तीन च्या भाजपा उमेदवार सोनालीताई आशीष पिपरे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन निमित्त प्रचारार्थ व समस्त प्रभागात आयोजित भाजप उमेदवार विनोद चलाख, सोपान नैताम, प्रज्ञाताई साईनाथ साखरे यांच्या प्रचारार्थ कॉर्नरसभांच्या माध्यमांतून चामोर्शी नगरवासियांना केले. यावेळी जि. प. कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे, भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री आशिषभाऊ पिपरे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. चामोर्शी नगर पंचायतीच्या उर्वरित चार प्रभागाचा निवडणुकीचा बिगुल वाजला असून आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध प्रभागात कॉर्नरसभांच्या माध्यमांतून प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून शासकिय कामे असोत वा शासकिय नौकरी सर्वत्र भ्रष्टाचार माजविला आहे. या सरकारचे विकासाकडे कोणतेही लक्ष नाही. भाजपच्या नेतृत्वातील सरकारने केलेली कामे आपलीच आहेत हेच दाखविण्याचा खोटा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचे नेते करीत आहेत. त्यामुळे या खोटारड्या सरकाराला व त्यांच्या नावावर मत मागणाऱ्यांंना या निवडणुकीत धडा शिकविण्याची गरज आहे.
चामोर्शी शहरात जी विकासात्मक कामे दिसत आहेत ती भाजपा नेतृत्वातील आमदार खासदारांच्या प्रयत्नातून तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहेत. त्यामुळे विकासाला महत्त्व देणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आपण मतदान निवडून द्यावे, अशी विनंती आमदार डॉ. देवरावजी होळी व कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दहा अकरा आठ व तीन येथील आयोजित कॉर्नरसभांच्या माध्यमांतून चामोर्शी नगर वासियांना केली चारही प्रभागात भारतीय जनता पक्षाचे उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे व भारतीय जनता पक्षाचे वतीने आयोजित कॉर्नर सभांना नागरिक मतदार यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.