नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचा आनंद : जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार

156

– छल्लेवाडा येथे माळी समाजासाठी समाज भवनाचे लोकार्पण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे माळी समाज जास्त आहे. मात्र या समाजाच्या सांस्कृतीक तथा परम्परागत रूढी, परंपरा, चालीरीती यांचे जोपसना करण्यासाठी व समाजाच्या कार्यक्रम घेण्यासाठी समाजाच्या समाजभवन नसल्याने अडचण होत होती. सदर माळी समाज बांधवांंनी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली असता मागणीची दखल घेवुन जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिले होते. या समाज भवनाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते सदर समाज भवनाच्या बांधकामाच्या लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार उद्घाटन समारंभ कार्यक्रमात बोलताना म्‍हणाले, उमानूर-रेपनपली क्षेत्रातून मी जेव्हा पाहिलंदा जि. प. साठी उभे झालो असता नागरिकांनी अनेक समस्या सांगितले कारण कि, या क्षेत्रात मागील अनेक वर्षापासून समस्या आवासुन उभे होते या क्षेत्रातून निवडून आलेले लोकप्रतिनिधि याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे विकास काम झाले नाही. मि जेव्हा निवडून आलो तेव्हा पासून जास्त निधी या छल्लेवाडा गावासाठी देण्यात आले. आज मी या क्षेत्रातून जरी निवडून आलो नसलो तरी माझा लहान बंधु अजय नैताम ला जि. प. सदस्य म्हणून निवडून दिले असुन मी आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या नात्याने या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असुन जास्तीत जास्त कामे करू असे शब्‍द दिला होता. सदर शब्‍द मी पूर्ण करत जास्तीत जास्त जिल्हा परिषदेचे विकास निधीतुन मंजूर करू शकलो व छल्लेवाडा येते प्राधान्याने माळी समाजांसाठी जिल्हा निधीतून १० लाख मंजूर करून समाज भवनाच्या बांधकाम पुर्ण झाले असुन लोकार्पण आज माझा हस्ते झाला असल्याने याचा मनापासून आनंद असल्‍याचे ते यावेळी बोलताना म्‍हणाले.