रब्बी हंगाम सन 2021-22 या वर्षाची रब्बी पिकाची हंगामी पैसेवारी जाहीर

70

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : रब्बी पिकाची हंगामी पैसेवारी तहसीलदार यांच्याकडून प्राप्त माहितीचे आधारे संकलीत करुन गडचिरोली जिल्ह्याची सन 2021-2022 या वर्षाची रब्बी पिकाची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण 1689 गावे असून रब्बी पिकाची गावे 148 आहेत. त्यापैकी रब्बी गावामध्ये पिके नसलेली गावे 76 आहेत. सदर रब्बी पिक असलेल्या गावांंपैकी 50 पैशाच्या आत पैसेवारी असलेले रब्बी गावे 0 असून 50 पैशाच्या वर पैसेवारी असलेल्या एकूण रब्बी पिक असलेल्या गावांची संख्या 72 आहेत. अशा प्रकारे एकूण 72 रब्बी पिक असलेल्या गावाची पैसेवारी जाहीर केलेली आहे. गडचिरोली जिल्ह्याची रब्बी हंगाम 2021-2022 या वर्षाची हंगामी पैसेवारी ही 0.70 आहे, असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.