– महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप तर नगरपरिषद येथे वृक्षारोपण
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप व वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोदजी पिपरे, नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुुडे यांच्या हस्ते शहरातील महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तसेच नगर परिषद येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर कुंभरे, संपर्क प्रमुख जनार्धन साखरे, नगरसेविका वैष्णवी नैताम, लताताई लाटकर, निताताई उंदिरवाडे, पूनम हेमके, राजू शेरकी, देवाजी लाटकर, सोमेश्वर धकाते, सुभाष उप्पलवार, हर्षल गेडाम, मधुकर भांडेकर, अविनाश महाजन, गजानन येनगंधलवार, प्रशांत अमलपटलावार, रामन्ना बोनकुलवार, अनिल करपे, श्याम वाढई यांंच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.