दुर्गाताई काटवे या मनमिळाऊ स्वभावाच्या व कर्त्यव्यदक्ष महिला : नगराध्यक्ष योगीताताई पिपरे

93

– भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने दुर्गाताई काटवे यांना श्रद्धांजली अर्पण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दुर्गाताई काटवे या भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष, लोकमत सखी मंचच्या सदस्या, विविध बचत गटांची अध्यक्ष तसेच अनेक सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्या होत्या. मनमिळाऊ स्वभावाच्या व भारतीय जनता पार्टीमध्ये कार्य करीत असताना कर्त्यव्यदक्ष होत्या, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी दुर्गाताई काटवे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना केले.
भारतीय जनता पार्टी गडचिरोली महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा तथा शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे यांच्या पत्नी दुर्गाताई काटवे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी भाजपाा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोदजी पिपरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष योगिताताई भांडेकर, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडापे, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, महिला मोर्चा आदिवासी आघाडी जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकरराव भांडेकर, नगरसेविका वैष्णवीताई नैताम, निताताई उंदीरवाडे, पूनम हेमके, लताताई लाटकर, भाजपा नेते बंडूभाऊ झाडे, विलास नैताम, राजूभाऊ शेरकी, वच्छलाबाई मुनघाटे, पल्लवीताई बारापात्रे, रुपाली सातपुते यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.