शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते गिलगाव येथील रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

94

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आज, 14 डिसेंबर 2021 रोजी निसर्गरम्य स्टेडियम गिलगाव येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्धघाटन शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य गडचिरोली अरविंद शभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी बोलताना शिवसेना सहसंपर्क तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले की, गडचिरोली तालुक्यातील ग्रामीण भागातील गिलगाव येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून खऱ्याअर्थाने मंडळाने ग्रामीण भागातील खेळाडुुंंना नैपुण्य दाखविण्यासाठी व्यासपीठ तयार करून दिले आहे. ग्रामीण भागातील खेळाडू अत्यंत काटक आणि शक्तिशाली असतो. त्यामुळे यानंतर जिल्हा स्पर्धा, विभागीय स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा यांच्या निवड़ीसाठी त्याने प्रयत्न करावे. यासाठी शिवसेना त्याच्या सदैव पाठीशी असेल. या क्रिकेट स्पर्धेत 50 संघाने सहभाग घेतल्यामुळे आपल्या ग्रामीण भागात क्रिकेट खेळाप्रती अत्यंत आवड़ दिसते आहे. मंडळाला दरवर्षी क्रिकेट स्पर्धा घेण्याकरिता मी व्यक्तीशा आवश्यक असलेली आर्थिक मदत करेन. स्पर्धा शांततेत व शिस्तित पार पाडल्या गेल्या पाहिजे, याची अयोजकांंनी दक्षता घ्यावी. शासनाकडून गिलगाव येथे क्रीडांगनाच्या मंजुुरीसाठी प्रयत्न केले जातील, असेही कात्रटवार यावेळी बोलताना म्हणाले. या क्रिकेट स्पर्धेच्या उद्धघाटन प्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, रामरतन गोहणे, प्रमोद सििडाम, काळबांधे साहेब, नरुले सर, बुरबादे सर, ठाकरे साहेब, धवले साहेब, पिलारे साहेब, मेश्राम साहेब, बांगरे मेजर, कुळमेथे साहेब, किरमिरे सर, चुधरी सर, राकेश गोड़सेलवार, धवलकार साहेब, रणदिवे सर, वाघ सर, गोहने बाबुसाहेब, बंसोड़ सर, खोब्रागडे सर, प्रकाश मेश्राम, इंगळे सर, मशाखेत्री सर, रामटेके साहेब, चुधरी सर व मंडळाचे सदस्य प्रशांत ठाकूर, तुषार बोरकर, अनिल कोम्शीले, हर्षल रामटेके, गणेश भोयर, जयंत मेश्राम, आकाश सोरते, आशीष भरणे, चेतन कुर्वे, मनोज हर्षे, अजिंक्य नगराळे, खाईश फुलझेले, चंद्रहास मस्के, प्रवीण आवारी यांच्या सह गावातील नागरिक व खेळाडू उपस्थित होते.