भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने आनंद महोत्सव कार्यक्रम

73

– देशात मुलींचा जन्मदर वाढल्याने पंडित जवाहरलाल नेहरू नप उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींना खाऊचे वाटप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढावो ,सुकन्या, आत्मनिर्भर, आरोग्य सेवा इत्यादी योजनातून महिला सबलीकरणावर भर दिला आहे. आज देशात मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा १०२० ने वाढला असल्याने भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा रामनगर गडचिरोली येथे आनंद महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. तसेच विद्यार्थिनींंना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष योगिताताई भांडेकर, नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडापे, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, मुख्याध्यापक सुधीर गोहणे, ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, नगरसेविका वैष्णवीताई नैताम, निताताई उंदीरवाडे, लताताई लाटकर, रोषनी बानमारे, पूनम हेमके, रुपाली सातपुते यांच्यासह भाजपा महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्या व शिक्षकवृंद उपस्थित होते.