मनोरंजनासोबत स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळवून देणारा मंच म्हणजे नाटक : महेंद्र ब्राम्हणवाडे

83

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : टी. व्ही, मोबाईल, इंटरनेटच्या काळात स्थानिक कलाकारांणा रोजगार निर्मिती करून देणारे नाटक आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत धुंडेशिवणी येथील नाट्य कला मंडळाने आयोजित केलेले नाटकाचे प्रयोग प्रशंसनीय आहे. या माध्यमातून अनेक कलाकारांना रोजगार मिळत असून गाव खेड्यात प्रबोधन होत आहे. सोबतच या माध्यमातून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळतो, असे मत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील धुंडेशिवणी येथील नाटक सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्ष म्हणून भाजपा जिल्हा महामंंत्री प्रशांत वाघरे, मुख्य अतिथी वासुदेव शेडमाके, अरुण पा. मुनघाटे, पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, सुनील पोरेड्डीवार, ठाकरे साहेब, सुरेश रंधये, संजय चने, विपुल येलटीवार, गौरव येणप्रेद्दीवार, सरपंच फुलझले, पंढरी निकुरे, कुणाल ताजने सह मान्यवर व मोठ्या संख्येने नाट्यय रसिक श्रोते या ठिकाणी उपस्थित होते.