डार्ली येथील ‘सैराट लावणी व डान्स’चे शिवसेना सहसंपर्क अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते उद्घाटन

108

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील मौजा डार्ली येथे नवदुर्गा नाट्य कला मंडळ डार्ली यांच्या सौजन्याने “सैराट लावणी व डान्स” चे आयोजन 10 डिसेेंबर रोजी केलेले होते. या लावणी व डान्सचे उद्धघाटन शिवसेना सहसंपर्क तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते झाले. वर्षभर शेतकारी शेतात राबतो. शेतीची मळनी होताच ग्रमीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांच्याच एक भाग म्हणून आज डार्लल येथे नवदुर्गा नाट्य कला मंडळ डार्ली यांच्या सौजन्याने “सैराट लावणी व डान्स” चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंदसिंह चंदेल, युवासेना जिल्हा प्रमुख चंदूभाऊ बेहरे, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, विजय चाटे, बांधकाम सभापती सागर मने, भूषण सातव शहर प्रमुख आरमोरी, टिकाराम लाकड़े पोलिस पाटील, आभारे सर, वसंत गेडाम, ईश्वर पाटील लाकड़े, सुषमा मड़ावी, गणेश लाकड़े, गड़पायले साहेब, मनोज भरणे, प्रकाश गेडाम, तसेच नवदुर्गा नाट्य कला मंडळ डार्ली येथील पूंंजीराम मेश्राम, यशवंत निकुरे, नितेश मड़ावी, दशरत शेडमाके, कृष्णकुमार लाकड़े, खेमराज खेवले, आनंदराव गेडाम, मनोज मेश्राम, विश्वनाथ कोवे, किरिचन करकाड़े, सखाराम मेश्राम, आशीष शेडमाके, गणेश ठाकूर, दिवाकर कुमरे, श्रीरंग कोवे, किशोर निकुरे, हेमंत देशमुख, पुरूषोत्तम करकड़े, प्रफुल ठाकुर, अशोक भोयर, गवकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.