नृत्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन व कलाकारांना रोजगार मिळवून देणारी लोककला म्हणजे लावणी : महेंद्र ब्राम्हणवाडे

114

– डार्ली येथे लावणी स्पर्धेचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नृत्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारी महाराष्ट्रातील प्राचीन लोककला म्हणजे लावणी असून लावणी व नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांच्या केलेला वाव मिळतो. या माध्यमातून नेहमीच स्थानिक कलाकारांना रोजगार मिळवून देण्याचे काम केलेले आहे, असे मत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केले.
बाल गणेश मंडळ डार्लीच्या वतीने डार्ली येथे लावणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आम. आनंदराव गेडाम यांच्या हस्ते पार पडले. मुख्य अतिथी म्हणून जि. प. सदस्य वनिता सहाकाटे, वडधाच्या सरपंच प्रिया गेडाम, माजी सरपंच अर्चना कोलते, ग्रा.प. सदस्य रोहनी धुर्वे, भुपेश कोलते, गजबे वनरक्षक आदी मान्यवर व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यावेळी उपस्थित होते. स्पर्धेचे यशस्वी आयोजन मंडळाचे अध्यक्ष राजू कोडाप यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पदाधिकारी व गावकऱ्यांनी केले.