दुर्गा काटवे यांचे निधन

84

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील सर्वोदय वॉर्ड राम मंदिर परिसरातील रहिवासी असलेली भाजपा महिला तालुकाध्यक्ष दुर्गा मुक्तेश्वर काटवे यांचे रविवार, 12 डिसेंबर रोजी पहाटे 5.10 वाजता नागपूर येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 36 वर्षांच्या होत्या. येथील नगरसेवक मुक्तेश्वर काटवे यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, सासु, सासरे, दोन भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृतदेहावर रविवारी सायंकाळी येथील कठाणी नदीपत्रात अंतिम संस्कार करण्यात आले.