Home गडचिरोली जिल्ह्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चामोर्शी येथे घंटानाद आंदोलन

जिल्ह्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चामोर्शी येथे घंटानाद आंदोलन

104

– ईडी, सी.बी.आय, इन्कम टॅक्सला विरोध

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची सक्तवसुली संचालनालय (ईडी) कडून होत असलेल्या चौकशी निषेध करण्यासाठी1 फेब्रुवारी 2024 ला चामोर्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केली. दरम्यान, चामोर्शी बसस्टॉपजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे चामोर्शी तालुकाध्यक्ष कबीर आभारे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर चिंतलवार, किसान सेल जिल्हाध्यक्ष सुरेश परसोडे, नगरसेवक तथा को. ऑप. बँक संचालक अमोल गण्यारपवार, गडचिरोली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राजु आत्राम, जिल्हा संघटन चिटणीस गुरूदास चुधरी, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष किरण कोवासे, शहरध्यक्ष सुरेशभाऊ नैताम यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

तसेच चामोर्शी तालुक्यातील सामान्य नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत विविध समस्यांना घेऊन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार प्रशांत घोरूदे यांना निवेदन देण्यात आले.

विरोधी पक्षाच्या नेत्याविरुद्ध केंद्र सरकार जाणीवपूर्वक कार्यवाईचा फार्स करीत असून या विरोधात निदर्शन करण्यात आले. यावेळी केंद्रातील सरकारचा निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात व देशामध्ये विविध प्रश्न मोठ्याप्रमाणात प्रलंबित असताना देखील राज्य सरकार व केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. जिल्ह्यातील धान्य शेतकऱ्यांना सरसकट बोनस देण्यात यावे, शेतीसाठी शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करावी, GST दर कमी करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या परवानगी शिवाय शेतकऱ्यांची सुपीक जमीन औद्योगिक किंवा इतर कारणास्तव घेण्यात येऊ नये, ओबीसी प्रमाणे ढिवर समाजाला घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावे, गाव येथे कृषी गोडावून देण्यात यावे, स्वामिनाथन आयोगाचे शिफारशी लागू करावे इत्यादी 50 मागण्यासह तहसीलदार चामोर्शी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी चामोशी तालुकाध्यक्ष कबीर आभारे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर चिंतलवार, जिल्हा सरचिटणीस नरेंद्र जुवारे, जिल्हा संघटन चिटणीस गुरूदास चुधरी, किसान सेल जिल्हा अध्यक्ष सुरेश परसोडे, जिल्हा आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष किरण कोवासे, गडचिरोली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राजु आत्राम, नगरसेवक तथा को.ऑफ बँकचे संचालक अमोलभाऊ गण्यारपवार, चामोर्शी शहरध्यक्ष सुरेश नैताम, मुरलीधर बुरे, शामराव पोरटे, विनोद शेंगर, करण गण्यारपवार,नामदेव किन्हेकर, गुरूदास चापडे, योगेश्वर लोडे, मेघराज वैद्य, पुंजाराम वासेकर, महासंघ साबडे, गुलाब धोती यांच्यासह शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!