Home गडचिरोली गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनतर्फे खा. अशोकजी नेते यांचा सत्कार

गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनतर्फे खा. अशोकजी नेते यांचा सत्कार

115

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ७ व्या युवा संसदेत गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांचा ‘आदर्श खासदार’ म्हणून सन्मान पुण्यात जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने करण्यात आला, त्या मिळालेल्या सत्कारानिमित्य गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन ने त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

खासदार अशोक नेते यांच्या सत्कार सोहळ्याला गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनचे संयोजक हेमंत डोर्लीकर, संदिप कांबळे, ज्येष्ठ पत्रकार जयंत निमगडे, अनिल बोदलकर, उदय धकाते, किशोर खेवले, व्यंकटेश दुडमवार, बाळू म्हशाखेत्री, जगदीश कन्नाके सचिन जीवतोडे, नारायण सोनूले हे उपस्थित होते.

error: Content is protected !!