Home गडचिरोली आदर्श खासदार पुरस्कार मिळाल्याबद्दल खा. अशोक नेते यांचा जाहीर सत्कार

आदर्श खासदार पुरस्कार मिळाल्याबद्दल खा. अशोक नेते यांचा जाहीर सत्कार

121

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा यांचा पुण्यातील प्रसिध्द संस्था जाधवर ग्रुपच्या वतीने पुण्यातील सातव्या युवा संसदेत आदर्श खासदार म्हणून सन्मानित करण्यात आला. ही गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने फार आनंदाची बाब आहे. त्यानिमित्त स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रबोधिनी गडचिरोलीतर्फे खासदार अशोकजी नेते यांचा जाहीर सत्कार समारंभ ३ फेब्रुवारी २०२४ रोज शनिवारला सायंकाळी ५ वाजता साई मंदिर, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती म्हणून खासदार अशोकजी नेते तर प्रमुख पाहुणे भाजपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जेष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे, जिल्हा संघचालक घिसूलालजी काबरा, शिवसेना सहसंपर्क प्रमुख हेमंतजी जम्बेवार, स्वा. वि. दा. सावरकर प्रबोधिनी उपाध्यक्ष प्रमोदजी पिपरे, विश्व हिंदू परिषदेचे रामायणजी खटी, भाजपा जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला नागरिक बंधू भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रबोधिनी गडचिरोलीचे अध्यक्ष रमेशजी भुरसे, उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, सचिव ॲड. ए. एस. निळकंठ भांडेकर, सुधाकर पेटकर, दत्तू माकोडे, रवींद्र भांडेकर, प्रशांत आलमपटलावार, विनोद देवोजवार यांनी केले आहे.

error: Content is protected !!