Home गडचिरोली युवक काँग्रेसची ‘युथ जोडो बूथ जोडो’ बैठक संपन्न

युवक काँग्रेसची ‘युथ जोडो बूथ जोडो’ बैठक संपन्न

100

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी येथील बालाजी सभागृहात तालुका युवक काँग्रेसची बैठक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ऍड. विश्वजीत कोवासे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. सदर बैठकीत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. होऊ घातलेल्या 2024 च्या आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपर्यंत वेगवेगळ्या गावामध्ये पक्ष बांधणीचे काम जलद गतीने व्हावे आणि मोठ्या संख्येने युवक वर्ग यात सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन कोवासे यांनी केले.

बूथ सक्षमीकरणाचे मुद्दे असतील युवकांच्या माध्यमातून पक्ष कसा बळकट करता येईल या संदर्भात वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. कोनसरी प्रकल्पात शेतकऱ्यांची जागा अधिग्रहण करून सुद्धा त्या युवकांना रोजगार मिळू शकला नाही व प्रकल्पग्रसतांना उधारनिर्वाह करण्या मोठे संकट उपस्थित झाले असून शासन मात्र तुटपुंजी मदत करत आहे. त्याचप्रमाणे सूरजागड प्रकल्पाचा मुद्दा असेल, अश्या अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. शेवटी विश्वजित कोवासे म्हणाले की, सीता मय्या भी परेशान है मोदीजी के काम से सारे पैसे खा गये रे, बेरोजगारी, इडी, सीबीआय,के नाम से…अस होऊ नये म्हणुन आपल्याला बूथ सक्षमीकरण महत्वाचे आहे अस कार्यकर्त्यांना मार्गदर्शनातून सांगीतले सदर बैठकीला युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेश ठाकूर, युवक काँग्रेसचे महासचिव नितेश राठोड, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल बारसागडे, तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रेमानंद गोंगले, नेहाल आभारे, महासचिव रोशन कोहळे, नाजूक वाळके, जिल्हा सचिव हेमंत कुमरे, श्रीकृष्ण तोडसाम, तालुका सचिव बादल धोटे, सचिव युवक काँग्रेस तेजस कोंडेकर,जीवक धांडे, पंकज मडावी, करण कुळसंगे, आशिष घेरे, हर्षल किरमे व अन्य पदाधिकारी व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!