– नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार अशोक नेते यांचे आवाहन
– अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर यांची उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
ब्रह्मपुरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध योजनांच्या माध्यमातून देशातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांचे भारताला विकसित राष्ट्र बनविणे हे स्वप्न आहे. मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली आणि योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले.
ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी (खुर्द) येथे “अंधारलेल्या वाटा” या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानावरून काँग्रेसचा हल्लाबोल व भरपूस समाचार घेताना ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर म्हणाले की, त्यांना असे म्हणण्याची वेळ आली आहे की, आपल्या कार्यक्रमांना भाजपा कार्यकर्त्यांना बोलाऊ नका. भाजपाचा एवढा धसका का..ये डर बहोत अच्छा लगा, असे ते म्हणाले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा संघटन महामंत्री माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे, माजी समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, डॉ. गोकुल बालपांडे, वंदनाताई शेंडे आदी मान्यवरांनी संबोधित केले.
या कार्यक्रमाला भाजपा शहराध्यक्ष इंजि. अरविंद नंदुरकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रा. रामलाल महादेव दोनाडकर, भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष प्रा. डॉ. अशोक सालोटकर, नगरसेवक मनोजभाऊ वठे, भाजपा युवा नेते साकेतभाऊ भानारकर, भाजपा युवा नेते रितेश दशमवार, प्रा. यशवंतभाऊ आंबोरकर, तनय देशकर, राजेंद्र आंबोरकर, देवराव नन्नावरे, राजेश्वर शिऊरकर, ज्ञानेश्वर दिवटे, धीरज पाल आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार भास्कर तिजारे यांनी तर प्रास्ताविक सरपंच अनिल तिजारे यांनी केले.





