Home चंद्रपूर साहित्य वाटप करून मूळ समस्यांपासून लक्ष विचलित करणाऱ्या जनप्रतिनिधींना मतदान करू नका...

साहित्य वाटप करून मूळ समस्यांपासून लक्ष विचलित करणाऱ्या जनप्रतिनिधींना मतदान करू नका : डॉ. नामदेव किरसान

114

– मौशी येथे नाट्यप्रयोगाचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : काही जनप्रतिनिधी लाडू, चिवडा, मंगळसूत्र, कुकर अशा प्रकारचे साहित्याचे वाटप करतात व जनतेच्या महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था व अशा अनेक मूळ समस्या विसरायला भाग पाडून मतं लाटण्याचं काम करतात. याबाबत सावधगिरी बाळगून कोणत्याही आमिषाला बळी न पडता अशा प्रतिनिधींना मतदान करू नये. सर्वसामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन 11 डिसेंबर 2023 रोजी नागपूर विधान भवनावर आयोजित केलेल्या हल्लाबोल मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी केले.

मौशी (ता. नगभिड, जि.चंद्रपूर) येथे 9 डिसेंबरला “बायको नंबर वन” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटकीय भाषणात आमिषे दाखवून मत मागणाऱ्या जनप्रतिनिधींवर ताशेरे ओढताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून चिमूर विधानसभा समन्व्यक सतीशभाऊ वारजूरकर, विनोदभाऊ बोरकर, माजी जि. प. सदस्य खोजरामजी मरसकोल्हे, माजी पं. स. सभापती भाऊरावजी पांडव, सरपंच कमलाकरजी ठवरे, मोरेश्वरजी देशमुख, रुपेशजी टिकले, रामकृष्णजी देशमुख, पटवारीजी देशमुख, भाऊरावजी पांडव, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते.

error: Content is protected !!