Home गडचिरोली ग्रंथ हे गुरूसारखे मार्गदर्शक : आ. कृष्णाजी गजबे

ग्रंथ हे गुरूसारखे मार्गदर्शक : आ. कृष्णाजी गजबे

160

– वैरागड येथे दादालोरा खिडकी सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 29 ऑक्टोबर : भारत वर्षात गुरुकुल परंपरेने आदर्श पीढी निर्माण केली. चांगले पुस्तक माणसाला नेहमी चांगला विचार देत असतात. पुस्तकाची सोबत म्हणजे चांगल्या विचारांची सोबत होय. म्हणून ग्रंथालय हे गुरूसारखे मार्गदर्शक ठरतात, असे प्रतिपादन आ. कृष्णाजी गजबे यांनी केले.

पोलीस स्टेशन आरमोरी दादारोला खिडकी व ग्रा. पं. वैरागडच्या वतीने वैरागड येथील ग्राम सचिवालयाच्या सभागृहात शहीद पोलीस कोमल भानारकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले. या वाचनालयाच्या उद्धघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे, पोलीस निरीक्षक संदीप मडलीक, ग्रा. पं. सदस्य आदेश आकरे, छानु मानकर, सत्यदास आत्राम, संगीता मेश्राम, दिपाली ठेंगरे, तंमुस अध्यक्ष पांडुरंग बावनकर, महादेव दुमाने, डोणू कांबळे, बालाजी पोपळी, पोलीस पाटील गोरखनाथ भानारकर, प्रा. प्रदीप बोडणे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस कर्मचारी ठाकरे यांनी केले. संचालन नेताजी बोडणे यांनी तर आभार प्रदर्शन वैरागड बीट अंमलदार मुनघाटे यांनी केले. हे सार्वजनिक वाचनालय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच सुरू ठेवले जाणार आहे.

error: Content is protected !!