Home गडचिरोली ताणतणाव व्यवस्थापनाचे शिक्षकांना मार्गदर्शन

ताणतणाव व्यवस्थापनाचे शिक्षकांना मार्गदर्शन

227

– सांगात संस्थेचा पुढाकार : कारवाफा आश्रमशाळेत कार्यशाळा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २९ ऑक्टोबर : सांगात संस्थेच्या पुढाकाराने मानसिक आरोग्य संवर्धन कार्यक्रम अंतर्गत गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा कारवाफा येथे सामान्य मानसिक आरोग्य या विषयावर शिक्षकांची कार्यशाळा शनिवार, २८ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत जीवनातील ताण-तणाव व्यवस्थापनबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन मुख्याध्यापक विजय देवतळे यांच्या हस्ते झाले. सदर कार्यशाळेत शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याच्या समस्या कशा सोडवायच्या याबाबत उपाय सुचविण्यात आले. दैनंदिन जीवन जगत असताना व्यक्ती ताण-तणावाला सामोरे जातो. याची कारणे काय असू शकतात, आपल्या कामावर ताण-तणावाचा परिणाम कसा होतो, योग्यरित्या ते कसे हाताळायचे व ताण-तणाव कमी करुन मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबाबत उपयुक्त माहिती या कार्यशाळेतून देण्यात आली.

सदर कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून सांगात संस्थेच्या पर्यवेक्षक सपना मानपल्लीवार, वरिष्ठ संशोधक राहुल गवई, समुपदेशक वैभवी देव्हारे उपस्थित होते. कार्यशाळेत उच्च माध्यमिक शिक्षक एम. ई. ठाकूर, सी. डी. नळे, टी. ए. आस्कर, पद्मावती महेशगौरी, माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, व्ही. व्ही. चव्हाण, वर्षा मस्के, पदवीधर प्राथमिक शिक्षिका चंदा कोरचा, प्राथमिक शिक्षक झेड. एच. फाये, रविकांत पिपरे, आय. एम. कुमरे, कविता बारसागडे, अभय कांबळे, अधीक्षक जी. एस. सानप, अधीक्षिका पुष्पा चव्हाण आदींनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!