– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात पूर्णवेळ उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गडचिरोली नगराचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव तुळजाबाई प्राथमिक शाळा आरमोरी रोड गडचिरोली येथे संपन्न झाला. या उत्सवाला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी पूर्ण गणवेशात पूर्णवेळ उपस्थित होते. पथसंचालनातही त्यांनी सहभाग घेतला. या उत्सवाला प्रमुख अतिथी पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणे यांनी तर प्रमुख वक्ते म्हणून संघाचे प्रांत बौद्धिक प्रमुख उल्हासजी ईटणकर यांनी मार्गदर्शन केले.







