Home गडचिरोली खा. अशोकजी नेते यांची चामोर्शी येथील जनसंपर्क व तक्रार निवारण कार्यालयास सदिच्छा...

खा. अशोकजी नेते यांची चामोर्शी येथील जनसंपर्क व तक्रार निवारण कार्यालयास सदिच्छा भेट

153

– सेवानिवृत्त नायब तहसीलदार हनुमंत डंबारे यांचा भाजपात प्रवेश

विदर्भ क्रांती न्यूज

चामोर्शी : तालुक्यातील जनतेच्या समस्या, अडीअडचणी, विविध छोटी मोठी कामे, नागरिकांशी संपर्क या इतर बाबी लक्षात घेऊन खासदार अशोकजी नेते यांनी चामोर्शी येथे जनसंपर्क व तक्रार निवारण कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते, विकास पुरुष, राज्याचे झुंजार, तडफदार नेतृत्व राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोकजी नेते यांनी आज रविवार, २९ ऑक्टोबर रोजी मुलचेरा तालुका दौऱ्यावर जात असताना चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन चामोर्शी तालुक्यातील पदाधिकारी यांच्याशी संपर्क करुन भेटी गाठी घेत संघटनात्मक चर्चा केली.

याप्रसंगी माजी सेवानिवृत्त नायब तहसीलदार हनुमंत डंबारे यांनी खासदार अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वात भाजपात पक्ष प्रवेश केला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी खासदार नेते साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है असा जयघोष करत भारतीय जनता पार्टीचा विजयी असो जयघोष केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, माजी जि. प. अध्यक्ष तथा भाजपाचे नेते समया पसुला, तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर, शहराध्यक्ष सोपान नैताम, कृ. उ. बा. स. संचालक रमेश बारसागडे, बंगाली आघाडीचे नेते दिपक हलदार, जेष्ठ नेते माणिक कोहळे, माजी सेवानिवृत्त नायब तहसिलदार हनुमंत डंबारे, आदिवासी आघाडीचे महामंत्री रेवनाथ कुसराम, ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, नरेश अलसावार, विजय गेडाम, राजू धोडरे, शेषराव कोहळे, वासुदेव ‌चिचघरे, विलास चरडूके, डोमदेव वनेवार, निरज रामानुजमवार तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!