माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून सत्कार व आर्थिक मदत

9

– आंतरराष्ट्रीय धावपटू लच्चा वेलादी यांना दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी, १९ ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय धावपटू व कांस्यपदक विजेता लच्चा दुग्गा वेलादी याची आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि. प. अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग असलेल्या दोडगीर गावातील लच्चा दुग्गा वेलादी या युवकाने राष्ट्रस्तरावरील धावपटू स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. तसेच हरियाणा राज्यात पार पडलेल्या आंतरराज्य स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. अश्याप्रकारे सुवर्णधाव घेत त्याने दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू लच्चा दुग्गा वेलादी यांची घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. असे असतानाही त्यांनी गरिब परिस्थितीला तोंड देत त्याने क्रीडा क्षेत्रात आपले नाव कमावले. मागील महिन्यात २८ ते ३० जुलै दरम्यान हरियाणातील पानिपतमध्ये इंडियन ऑल्पिक ऑथेलेटिक्सच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्र चमूकडून लच्चा वेलादी याने प्रथमस्थान पटकावले होते. त्यांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. आता दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याची निवड झाली आहे. ६ ते ९ ऑक्टोबर २०२३ मध्ये सदर स्पर्धा होणार आहे. ५ ऑक्टोबरला संघ दुबईला रवाना होईल. या संघात भारताकडून लच्चा दुग्गा वेलादी प्रतिनिधित्व करणार आहे हे विशेष.