भाजपाच्या विस्तारक योजनेतून आ. डॉ. देवरावजी होळी पुढील १० दिवस तेलंगाना राज्यात

47

– एका विधानसभा क्षेत्रात १० दिवस पूर्णवेळ भाजपा विस्तारक म्हणून काम करणार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १९ ऑगस्ट : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डाजी यांच्या निर्देशाने भारतीय जनता पार्टीच्या कामाचा विस्तार करण्याच्या विस्तारक योजनेतून आमदार डॉ. देवरावजी होळी पुढील १० दिवस तेलंगाना राज्यात भाजपा विस्तारक म्हणून पूर्णवेळ काम करणार आहेत. त्याकरिता आमदार डॉ. देवरावजी होळी तेलंगणा राज्यात पोहोचले असून या पुढील १० दिवस ते हैद्राबाद येथे निवासी मुक्कामी राहून काम करणार आहेत.