राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वात सिरोंचा येथील शेकडो युवकांनी केला भाजपात प्रवेश

56

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या पाचही तालुक्यातील अनेक गावातून मोठ्या संख्येने माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली गावागावातून सातत्याने युवावर्ग मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची युवा कर्तृत्ववान शैली, शांत संयमी स्वभाव, विकासाची दूरदृष्टी, विकासात्मक धोरण आणि युवा नेतृत्व गुण हे आजच्या युवा पिढीला आकर्षनाचं केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे सिरोंच्या तालुका दौऱ्यावर गेले असता तेथील विविध पक्षातील २०० युवा कार्यकर्त्यांनी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता आणि आता स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा, नगरम, तुमनूर, बोगापूर, अमराजी, आयथेटा, तुरायपल्ली,
नारायणपूर, मेळाराम, रामनजेप्पूर, कारसपल्ली, रंगाय्यापल्ली आदी गावातील शेकडो युवकांनी भाजपात प्रवेश केला.

अनेक गावातील शेकडो युवा वर्गानी अहेरी येथील रुक्मिणी महल येथे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची भेट घेतली आणि राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आणि त्या युवकांनी राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या हातात हात ठेवून आम्ही आजीवन अहेरी इस्टेटचे राजे आणि माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्यासाठी कार्य करू आणि भारतीय जनता पक्षाचे विकासात्मक धोरण शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करू, असे वचन त्यांनी यावेळी दिले आणि राजे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, गडचिरोली जिल्ह्याची आन-बान-शान युवा हृदय सम्राट राजे अंम्ब्रिशराव आत्राम अशी घोषणाबाजी केली.

यावेळी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा येथील त्या युवा कार्यकर्त्यांशी तालुक्यातील असलेले प्रश्न, अडचणी आणि स्थानिक समस्याविषयी चर्चा केली आणि आपण सदैव सिरोंच्या तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहो असे आश्वासन दिले. त्या युवा कार्यकर्त्यांसाठी राजे साहेबांनी मेजवानीची सोय केली आणि त्यांना सामाजिक कार्यासाठी सदैव धडपडत राहा आणि कार्य करत रहा, मी आपल्या सोबत सदैव आहो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी सिरोंचा आणि अहेरी येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.